U.S. Consul General Visits Nashik

U.S. Consul General Thomas Vajda visited the “grape city” of Nashik October 26-27, 2015 as part of his outreach to the different cities in western India in support of greater opportunities for U.S.-India trade and investment.  During what was his first visit to Nashik, Consul General Vajda visited the Lord Corporation; a North Carolina-based tech and manufacturing company that develops adhesives, coatings, and motion management devices.  He also visited Mylan Labs; a large generics and specialty pharmaceutical company based in Pennsylvania with operations in Nashik.

Outside of his business meetings, Consul General Vajda visited several of Nashik’s cultural sites.  At the Dadasaheb Phalke memorial museum, he learned about the life of the “Father of Indian cinema.”  He also toured the 2000-year-old Pandavleni Buddhist caves and the organization Pragati Abhiyan, where he observed firsthand their work to promote rural development and overcome poverty.

Consul General Vajda’s Nasik visit highlights U.S. government’s commitment to deepen people-to-people relationships and strengthen bilateral business and cultural ties.

***

Please find Marathi version of the press release below.

ऑक्टोबर २७, २०१५

यु एस कॉन्सुल जनरलयांची नाशिक भेट

मुंबई — द्राक्षांची राजधानी  म्हणून नावाजलेल्या नाशिक शहराला यु एस कॉन्सुल जनरल थॉमस वायडायांनी ऑक्टोबर २६ आणि २७, २०१५ रोजी भेट दिली. हि भेट मुंबई-स्थित यु एस कॉन्सुलेटच्या पश्चिम भारतातील महत्वाच्या शहरांच्याबरोबर असलेल्या देवाण घेवाणीचा भाग आहे.

नाशिकमधील वायडायांच्या या पहिल्या भेटीत त्यांनी दोन अमेरिकी कंपन्यांना भेटी दिल्या — प्रथम ऐड्हीसिव व तत्सम वस्तू उत्पादन करणारी नॉर्थ कॅरोलिनामधील “लॉर्ड कॉर्पोरेशन” व त्या नंतर औषध उत्पादन करणारी पेनीसीलव्हेनिआमधील “मायलेन लॅब. ” नाशिकमधील या कंपन्यांच्या कामाचा आढावा वायडांनी घेतला.

उद्यम व वाणिज्य क्षेत्रातील लोकांच्या भेटी घेतल्यानंतर कॉन्सुल जनरल वायडायांनी अनेक सांस्कृतिक स्थळांना भेटी दिल्या. भारतीय सिनेमाचे जनक आदरणीय दादासाहेब फाळकेयांच्या स्मृतीला अभिवादन करणाऱ्या वास्तूला वायडायांनी भेट दिली; त्याच बरोबर २००० वर्षांचा मौलिक इतिहास लाभलेल्या पांडवलेण्यांमधेही त्यांनी सफर केली. `प्रगती अभियान’ संघटनेला भेट देऊन त्यांनी समाज उत्थापनाचे काम समजून घेतले.

कॉन्सुल जनरल वायडायांची नाशिक भेट भारत आणि अमेरिकेच्या वाढत्या सांस्कृतिक व व्यापार संबंधांचे द्योतक आहे; आणि दोन्ही देशांच्या लोकांमधील स्नेहाचा परिपाक आहे.